HW News Marathi
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीची ३० जुलैला उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

औरंगाबाद | लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर आता राज्यात राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यात मोर्चेबांधणीत वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी ३० जुलैला जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे कॉंग्रेस आघाडीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडीचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या ३० जुलैला वंचित आघाडी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीत नव्या आणि तरुण दमाच्या उमेदवारांचा समावेश असणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभेतील कामगिरमुळे विधानसभा निवडणुकीत वंचितला कॉंग्रेस आघाडीत सामील करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र कॉंग्रेसच्या प्रस्तावावर वंचित फारशी इच्छुक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याच जवळपास निश्चित झाल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार! – मुख्यमंत्री

Aprna

जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा – सुजय विखे पाटील

News Desk