HW News Marathi
महाराष्ट्र

वांगणीत घरफोडी, २ लाखांचा ऐवज लंपास

वांगणी | वांगणी पश्चिम येथील अष्टविनायक अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या शशिकांत राजेश्वर मिश्रा यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोराने सोने, रोख रक्कम असा तब्बल दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शुक्रवार घडली असून यानंतर वांगणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने सध्या आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पवईत राहत असलेल्या नातेवाईकांच्या घरी मिश्रा कुटुंबीय शुक्रवारी सकाळी गेले होते. रात्री ११ वाजता मिश्रा आपल्या राहत्या घरी वांगणी येथे घरी आले. घराचा टाळा खोलण्यासाठी चावी काढली मात्र टाळल्याला हात लावताच संपूर्ण टाळा कडी कोयंड्यासह हातात आल्याने काही तरी घडले असल्याचे मिश्रा कुटुंबियांच्या लक्षात आले. घराचा दरवाजा उघडून पाहिले असता घरातील सर्व सामान सर्वत्र पसरलेले पहायला मिळाले.

कपाटाचे टाळे फोडून सर्व दागिने, पैसे, घराचे अधिकृत कागपत्र तसेच मुलांच्या शाळेचे, महाविद्यालयाचे महत्वाचे समान चोराने पळविल्याचे लक्षात आले. सर्व मिळून दोन लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरीला गेला असल्याचा अंदाज मिश्रा कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. वांगणी पोलीस चौकी येथे प्राथमिक माहिती दिल्यानंतर कुळगाव पोलीस ठाणे ग्रामीण बदलापूर येथे तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक आर.एस. नळकांडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर ‘हे’ खाते मिळाल्यानंतर विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

News Desk

‘सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात’ – उद्धव ठाकरे

News Desk

‘हा’मुख्यमंत्री वाईट आहे ,आव्हाडं अस का म्हणाले ?

News Desk