HW News Marathi
महाराष्ट्र

ऑनलाईन शिक्षण असूनही पालकांवर फीसाठी दबाव आणणाऱ्या संस्थांवर कारवाई होणार – वर्षा गायकवाड

नाशिक | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु असूनही पालकांवर शाळा संस्थाचालकांकडून फी देण्यासंदर्भात दबाव आणला जात असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आली आहे. फी देण्यासंदर्भात अशा अनेक तक्रारी आल्या असल्यामुळे यासंदर्भात राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे. राज्य सरकारने या वर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी संदर्भात कुठलीही जबरदस्ती करू नये तसेच त्यांना सवलत देण्यात यावं याकरिता जीआर देखील काढला आहे.

सरकारने जीआर काढूनही संस्थाचालकांकडून फी संदर्भात पालकांवर दबाव आणला जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहित शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. नाशिक येथील एका संस्थाचालक विरोधात पालकांकडून ही तक्रार आली असून या संदर्भात शिक्षण विभागावर कशी प्रकारे कारवाई करता येईल या संदर्भात पाहणी करत असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी सांगितली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही, मोठ्या पक्षासोबत युती करणे योग्य – रामदास आठवले  

News Desk

येवला औद्योगिक वसाहतीत सर्व पायाभूत सुविधा पूर्ण; नवउद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित करावे! – छगन भुजबळ

Aprna

डिजिटल उपक्रमांना चालना मिळणार दूरसंचार पायाभूत सुविधा निर्मिती धोरणास मान्यता

News Desk