HW News Marathi
महाराष्ट्र

विदर्भात उष्णतेची लाट, अमरावती, चंद्रपूरातील तापमान ४४ अंशांवर

नागपूर | विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि गोंदिया या जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरायला सुरुवात झाली आहे. सध्या अमरावती आणि चंद्रपूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. याचा परिणाम इतर जिल्ह्यातील उष्णतेचा पारा येत्या दोन ते तीन दिवसात ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीआहे.

पुणे वेधशाळेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील कमाल तापमानात मागील आठवड्यापासून लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी काळात मध्य महाराष्ट्रासह राज्यातील तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा, विधानपरिषदेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

Aprna

अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या…

News Desk

कोथरूडमध्ये लवकरच उभारणार ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक

Gauri Tilekar