HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय आजच, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

मुंबई | राज्यात पुरामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं. हे नुकसान होऊन ८ दिवस झाले तरी पूरग्रस्तांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे सरकारी मदत कधी येईल याची पूरग्रस्तांना प्रतिक्षा आहे. मात्र, त्यांची ही प्रतिक्षा अवघ्या काही तासातच संपुष्टात येणार आहे. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा शंभर टक्के निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आज (२८ जुलै) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे. यात पुरग्रस्त विभागाला मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्याआधीच विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आज होत असलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय होणार आहे. शंभर टक्के निर्णय होणार आहे. तसेच एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही अधिक मदत पूरग्रस्तांना दिली जाईल. या शिवाय छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही दिलासा दिला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दौरा करणं गैर नाही

विरोधी पक्ष नेत्यांनी पूर पाहणी दौरा करणं गैर नाही. पण त्याचवेळी निलंबित आमदारांसह काहीजण जातात आणि अधिकारी नाही म्हणून काहीजण कांगावा करतात हे चुकीचं आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.

तातडीची मदत जाहीर

दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल. तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे अशा कुटुंबांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार होईल. जे बाधित आहेत त्यांना जमीन दिली जाईल. त्यांचं एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचं काम केलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांकडे १२ नावांची यादी पोहोचली, प्रतीक्षा निर्णयाची!

News Desk

मुख्यमंत्र्यांना मनसे नेते अविनाश जाधव यांचा सवाल!

News Desk

बचत गटांना संधी देण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर विक्री मॉल उभारणार; सुनील केदार यांची घोषणा

News Desk