HW News Marathi
महाराष्ट्र

विजयेंद्र बिद्री नागपूर सीबीआयचे नवे अधीक्षक

नागपूर : चंबळ खोऱ्यात डाकूंना पळता भूई थोडी करणारे पोलीस अधिकारी विजयेंद्र बिद्री यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण(सीबीआय)विभागाच्या नागपूर युनिटच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू कॅडरचे आयपीएस अधिकारी असणाऱ्या बिद्रीयांना प्रतिनियुक्तीवर नागपुरात पाठविण्यात आले असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.

२००५ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले बिद्री यांची राजस्थान कॅडरसाठी निवड झाली होती. मात्र, लग्नानंतरत्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांना तामिळनाडू कॅडरमध्ये स्थानांतरित करण्यात आले. सर्वप्रथम त्यांना राजस्थानातील दऊसा येथेअतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी गुजर आंदोलन यशस्वीरित्या हाताळले. त्यानंतरस्पेशल आॅपरेशन ग्रुपचे अधीक्षक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. या पदावर असताना त्यांनी अमली पदार्थाचा देशातील सर्वातमोठा साठा जप्त केला होता. त्यांचे कर्तृत्व पाहून त्यांना चंबळच्या खोऱ्यात नियुक्त करण्यात आले. त्यांनी अनेक कुख्यात डाकूंचेएन्काऊंटर करून चंबळमध्ये दाणादाण उडवून दिली. त्यांच्याच कार्यकाळात अनेक कुख्यात डाकूंनी पोलिसांसमोर शरणागतीपत्करली होती. पुढे चेन्नईत त्यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे.

बिद्री यांची आई डॉक्टर असून वडील शंकर बिद्री निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. शंकर बिद्री १९७८ च्या तुकडीचेआयपीएस अधिकारी असून, त्यांनी बंगळुरु येथील पोलीस आयुक्त पदानंतर कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारीसांभाळली आहे. विजयेंद्र बिद्री यांची बहीण विजयालक्ष्मी यांनी यूपीएससीच्या २००१ या परीक्षेत देशात अव्वलस्थान मिळवले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवजात मुलीला मातेनेच जिवंत पुरले

News Desk

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

Aprna

राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावं, अब्दुल सत्तार यांची ऑफर

News Desk