HW News Marathi
महाराष्ट्र

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

मुंबई | वर्धा हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोप विकेश नागळाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज (१० फेब्रुवारी)  शिक्षा सुनावली आहे. परंतु न्यायालयाने कालच (९ फेब्रुवारी) आरोपीला दोषी ठरविले होते. आरोपीला आजीवन कारावास आणि ५ हजार रुरपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला ३ फेब्रुवारी २०२० रोजी पोलिसांनी अटक केले होते. आणि आरोपीला दोन वर्षांच्या कालावधीच्या शिक्षेत सूट मिळणार नाही,”  अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. 

दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिके एकतर्फी प्रेम करत होता. परंतु, पीडिता ३ फेब्रुवारीला २०२० ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी हजर होता. पीडिताच्या दिशेने आरोपी दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले. या घटनेत पीडिता ४० टक्के भाजली होती. यानंतर पीडितेला नागपूरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार होते. परंतु, पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पीडितेचे आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली होती. त्यामुळे पीडितेचे जंतुसंसर्गाशीही झुंज देत होती. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छ‌वास प्रणालीवर ठेवण्यात आले होते. पण, पीडिता १० फेब्रुवारी रोजी ब्लड प्रेशर हळूहळू कमी होते. यावेळी पीडितेला सकाळी दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला होता. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

News Desk

BMC Budget 2022-23 : शिक्षण समितीचा ३ हजार ३७० कोटीचा अर्थसंकल्प सादर, विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणावर भर

Aprna

वाहनांवरील लाल व अंबर दिवे तात्काळ काढून टाका –  आरटीओ नांदेड 

News Desk