HW News Marathi
महाराष्ट्र

‘पेट्रोल दरवाढीच्या बदल्यात सुविधा मिळाल्यात’, सुजय विखे पाटलांची खोचक टीका

अहमदनगर | देशात कोरोना सोबत अजून एक विषय सतावतोय, तो म्हणजे इंधन दरवाढीचा. पेट्रोल दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ‘इंधनाचे दर वाढले हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवा,’ असा अजब युक्तिवाद भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये एका रुग्णालयाचे अर्बन सेंटरच्या उदघाटन समारंभात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह त्याचे उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आले.

इंधनाचे दर वाढले हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात

काँग्रेस सतत सरकारने इंधन वाढवल्यामुळे आंदोलनं करत आहेत. आंदोलनांसंबंधी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘इंधनाचे दर वाढले हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना करोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवा. ३५ हजार कोटी रुपये खर्चून एवढी मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. हेच काम राज्य सरकारकडे होते, तेव्हा जागतिक निविदा काढूनही त्यांना ते करता आले नाही. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारने केलेल्या या जनहिताच्या कामाचीही नोंद घेतली पाहिजे’, असंही ते म्हणाले आहेत.

महाविकासआघाडीत बिघाडी झाली

सध्या राज्याच्या महाविकासआघाडी मध्ये कुरघोडी सुरु आहे. राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनता आणि प्रसार माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे,’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून बिघाडी झाल्याचे मानले जात असेल तरी प्रत्यक्षात हे सगळे खोटे आहे. अस्तित्वाची लढाई म्हणून हे सर्वजण सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. एवढ्या सहजासहजी ते वेगळे होणार नाहीत. फार तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढवतील मात्र, विधानसभा, लोकसभेला एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यातील अनेक प्रश्न हातळण्यात सरकार अपयश ठरले आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी या वादाला हवा भरली जात असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला गळती नाही, ‘हा’ तर राजकीय भ्रष्टाचार !

News Desk

मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी – नवाब मलिक

News Desk

…म्हणून मुख्यमंत्री विधानपरिषदेवर जाणार

swarit