लातूर | विधानसभा निवडणुकीत लातूनमधून दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेचे जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव आमदार म्हणून विधानसभेत जाणार आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख आणि लातूरमधून अमित देशमुख या दोघांचा बिनविरोधी विजयी झाला आहे. या दोघांना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर तिसरा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट टाकली. बाबा आम्ही करून दाखवले’ अशा अर्थाचे हे ट्वीट रितेश देशमुखांनी केले आहे.
We did it PAPPA!!! @AmitV_Deshmukh wins Latur (city) by 42000+ votes for the 3rd consecutive time.@MeDeshmukh wins Latur (rural) by 1,20,000 votes.
Thank you people of Latur for this faith & trust. pic.twitter.com/pOGFsmoEJU
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 24, 2019
रितेशने देशमुख यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “बाबा आम्ही करून दाखवलं’ अशा अर्थाचं हे ट्वीट रितेश देशमुखांनी केलं आहे. या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोन मुलं निवडणुकीच्या रिंगणात होती. त्या दोघांनाही यश मिळाल्यानंतर रितेश देशमुख यांनी ट्वीटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.” लातूरमध्ये देशमुखे घराणे गड राखणार की नाही याकडे साऱ्या राज्याचे लक्ष होते.
विलासराव देशमुखांचा मुलगा अमित देशमुख यांनी हॅटट्रिक साधत तब्ब्ल ४० हजार मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. मित देशमुखांनाही ४२ हजारहूनन अधिक मताधिक्यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा पराभव केला. शैलेश लाहोटी यांना ६८ हजार ४९७ मते पडले. तर दुसरा मुलगा धीरज देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत लातूर ग्रामीणची जागा ऐनवेळी शिवसेनेच्या वाट्याला गेली, त्यामुळे देशमुख कुटुंबियांची लढत अजून सोपी झाली. जवळपास एक लाखांच्या विक्रमी मतांची आघाडी घेत धीरज देशमुख विजयी झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन जागा आल्या आहेत, त्या दोन्ही जागा देशमुख बंधूंच्या रुपात आल्या आहेत हे विशेष.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.