HW News Marathi
महाराष्ट्र

शहरालगतच्या गावांचा पाणीपुरवठा तातडीने सुरु करा! – सुनिल केदार

नागपूर। नागपूर शहरालगतच्या ज्या गावांना नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. त्याच्या थकित पैशांमुळे पाणी पुरवठा थांबवणे योग्य नाही. जीवन प्राधिकरण थकित रकमेपैकी काही रक्कम भरणार असून दोन दिवसात पाणीपुरवठा पूर्वरत करा, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी काल (१७ जानेवारी)दिले.

शहरालगतच्या ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायतीच्या कुवतीनुसार पाणी पट्टी लावणे योग्य ठरेल. शहरी भागातील दराप्रमाणे ग्रामपंचायतीकडून पाणी पट्टी वसूल करणे अन्यायकारक होईल. तथापी हा निर्णय धोरणात्मक असल्यामुळे राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तूर्तास महानगरपालिकेने बोखारा गावासह ज्या गावांचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. त्याठिकाणी नियमित पाणी द्यावे, असे स्पष्ट केले.

कालच्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प अधिकारी विवेक इलमे उपस्थित होते. पेरी अर्बन गावांच्या विविध समस्या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवारे, कुंदाताई राऊत यांनीकेदार यांच्याकडे समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यासाठी कालची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बहादुरा, बेसा, कापसी, गोधनी, बोखारा, पिपळा, कापसी, बिडगाव, येरखडा, रनाळा, भिलगाव, खसाळा, कवटा, पावनगाव, कोराडी, वडधामणा, नागलवाडी, इसासनी, डिगडोह, निलडोह आणि रायपूर आदी गावांचा समस्यांवर चर्चा करण्यात आली. सांडपाणी व्यवस्थापन, पथदीवे, डुकरांवर पायबंद, शहर बसची सुविधा आदींवर चर्चा करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या आठवड्याभरात शरद पवारांशी चर्चा करून विधानपरिषदेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ | राजू शेट्टी

News Desk

जनधन खातेदारांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून रूपै एटीएम कार्डचे 8 मे पासून वितरण

News Desk

मराठा आरक्षण कुठे अडलंय | खासदार उदयनराजे भोसले

swarit