HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

अशोक चव्हाण दिल्लीत मराठा आरक्षणासाठी गेलेच नाहीत, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

मुंबई | राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे याेनी या आधीही केली होती. आता पुन्हा एखदा विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण हे दिल्लीत मराठा आरक्षणावरील सुनावणीबाबत वकिलांशी चर्चा करायला गेले नाहीत. त्यांना आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही. काँग्रेस नेते राजीव सातव हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी मोर्चेबांधणी करायला चव्हाण दिल्लीत गेले आहेत, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडे मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. तेव्हापासून विनायक मेटे सातत्याने चव्हाण यांच्यावर टीका करत आहेत. काल चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर मेटे यांनी आज पुन्हा एकदा चव्हाणांवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या नावाखाली चव्हाण हे दिल्लीत पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे सातव हे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी चव्हाण दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे ते लॉबिंग करत असल्याचा दावा मेटे यांनी केला.

अशोक चव्हाणांनी काल (११ जानेवारी) दिल्लीत मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची बैठक घेतली असं सांगून मराठा समाजाची व राज्याची फसवणूक केली आहे. या बैठकीला अभिषेक मनु सिंघवी वगळता कोणताच वकील उपस्थि नव्हता, असं सांगतानाच चव्हाणांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना का बोलावले नाही? असा सवालही त्यांनी केला होता.

मराठा आरक्षणावर येत्या २५ जानेवारीला सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना दिल्लीत होणाऱ्या बैठकीला याचिकाकर्ते, वकील आणि सीनियर कौन्सिल यांना घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. परंतु, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेशही पाळले नाहीत. पण चव्हाण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनाच घेऊन बैठकीला गेले आहेत, असा आरोप मेटे यांनी केला होता. चव्हाण मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवत आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.

Related posts

सोलापूरमध्ये ‘चेस द व्हायरस’ प्रभावीपणे राबवा!

News Desk

बहुजन नेत्यांचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा चुकीची – पंकजा मुंडे

News Desk

भेंडवळची भविष्यवाणी : यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस, देशात स्थिर सरकार येणार !

News Desk