HW News Marathi
महाराष्ट्र

‘‘त्या’ सूचने बदल, नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी’, विनायक राऊतांचा नितेश राणेंना सल्ला

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगत आमदार नितेश राणे यांना काल(९ सप्टेंबर) लूकआऊट सर्क्युलर जारी केलं आहे. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला आहे.

अधिक माहिती नितेश राणेंनी दिल्लीत जावून मिळवावी

विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे. डिएचएफल फायनान्स कंपनीच्या संचालकांनी या प्रकरणी केंद्राच्या गृहखात्याकडे लेखी तक्रार केली आहे. आमची रक्कम देणं असल्याने या दोघांना देशाबाहेर जावू देवू नका असं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या सूचना केंद्र सरकारच्या गृहखात्याने राज्य सरकारच्या गृहखात्याला दिल्या आहेत. याबाबतची अधिक माहिती नितेश राणेंनी दिल्लीत जावून मिळवावी, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला आहे.

किरीट सोमय्यांकडून अधिक माहिती मिळू शकेल

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील विनायक राऊत यांनी टीका केली आहे. नारायण राणे भाजपमध्ये येण्यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वर्षापूर्वी नितेश राणे यांनी विविध रिसॉर्टसाठी घेतलेल्या कर्जाचा आरोप केला होतो. त्यामुळे याबाबत किरीट सोमय्यांकडून अधिक माहिती मिळू शकेल, असा चिमटा राऊत यांनी काढला. लूकआऊट नोटीसही कायद्यानुसार आहे. जी कारवाई होतेय ती केंद्र सरकारच्या निर्देशाने होतेय, असा दावाही त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत.

राणेंचा ठाकरे सरकारवर आरोप

नितेश राणेंनी या प्रकरणी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. पाच महिने अगोदर आम्ही संबंधित बँकेला पत्र दिलं होतं की आम्हाला हे कर्ज सेटलमेंट करायचं आहे. बँकेकडे ते पत्र आहे. मग आता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा हा की आमचं हे लोन अकाऊंट मुंबईच्या बँकेत आहे. मग, पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर का काढलं? जर एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला लोन सेटलमेंट करायचं असेल तर अशापद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थच नाही. हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. हे लूकआऊट सर्क्युलर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देण्यात आलं आहे. सगळ्या एअरपोर्ट्सना. आम्ही या सर्क्युलरविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहोत. याला काही अर्थ नाही. कारण जे लोन आम्हाला 5 महिन्यांपूर्वी भरायचं होतं त्याची आता नोटीस काढून काही अर्थ नाही ना. ठाकरे सरकार आम्हाला घाबरलं आहे, अशा पद्धतीने पत्र आणि नोटीस काढत बसले आहेत, असंही ते म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीच्या नावात ज्याचं ‘शिव’हरवलं त्यांनी एनडीएमध्ये राम उरलाय का याची चर्चा करणं हास्यास्पद!

News Desk

राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या भाजपच्या त्या ७ नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई होणार

News Desk

माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही – रामदास आठवले

News Desk