HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो – विनायक राऊत

सिंधुदुर्ग | शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राचा रथ विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. मात्र नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको”, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.

राऊत यांनी काल ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही” अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही राऊत यांनी भाजपवर घणाघात केला. “मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. सरकार ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. मात्र भाजपने सत्तेत असताना नेमके काय दिवे लावले?”, असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

“मराठा संघटनांमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना वस्तूस्थितीची चांगली कल्पना आहे. मात्र, भाजप पुरस्कृत जो एक गट आहे त्यांना अशा प्रकारची अवदसा आठवत आहे”, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.“मराठा समाजाला विनंती आहे, आम्ही सर्वजन तुमच्यासोबत आहोत. महाराष्ट्र सरकार तुम्हाला न्याय देणार म्हणजे देणार”, असं आश्वासन विनायक राऊत यांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा! – अजित पवार

News Desk

“मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर…”,चंद्रकांत पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा  

News Desk

ओबीसी, व्हीजेएनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

News Desk