HW News Marathi
महाराष्ट्र

विनायक राऊतांचा केंद्र सरकारवर टीकेचा बाण तर खासदार प्रीतम मुंडेंचं सडेतोड उत्तर!

नवी दिल्ली। लोकसभेत १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेत राज्याच्या खासदारांनी आपली भूमिका मांडली. खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. याला भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. तसेच शिवसेनेलाही प्रीतम मुंडे यांनी आरक्षणावरून अप्रत्यक्षरित्या खडे बोल सुनावले.

मग लोकशाहीचा सन्मान नाही का?

“सर्वजण फिरून फिरून मराठा आरक्षणावर येत आहेत. दुसरा कोणता विषय येथे मांडताना दिसत नाही. राज्यांना राज्याचा निर्णय घेण्याचा निर्णय का बहाल करण्यात आला?. २०१८ नंतर केंद्राने सर्व अधिकार आपल्या ताब्यात ठेवले आहेत, अशी राज्यांना धास्ती होती. त्यानंतर केंद्राने राज्यांचे अधिकार राज्यांना देण्यासाठी पाऊल उचललं आहे. मग लोकशाहीचा सन्मान नाही का?, विकेंद्रीकरण झालेलं आहे. तुमच्या राज्याची सूची बनवण्याचे अधिकार तुम्हाला मिळालेले आहेत. या सूचीमध्ये आपण सर्व जाती समूहाचा विचार करतोय. मग वारंवार ही चर्चा मराठा आरक्षणावरच का येतंय? ज्या लोकांना मराठा आरक्षणाचा प्रचंड कळवळा येताना दिसतोय. आमचं सरकार राज्यात असताना सरकारने आपली भूमिका खंडपीठासमोर मांडली आणि हायकोर्टाने मराठा आरक्षण वैध आहे, असं ठरवलं.

त्यावेळेस आपला कळवला कुठे गेला होता

त्यावेळी कुणाला त्रास झाला नाही. आज जे विरोधात आहेत आणि भाजपाच्या त्या वेळच्या भूमिकेविषयी प्रश्न मांडताहेत.त्यावेळी त्यांनी कडाडून विरोध केला, असं माझ्या स्मरणात नाही. केंद्र आणि राज्यातील त्यावेळच्या सरकारची भूमिका चांगली नाही. म्हणून एनडीएतून बाहेर पडले, असं कुणी मला आठवत नाही. त्यावेळेस आपला कळवला कुठे गेला होता.” अशी बोचरी टीका प्रीतम मुंडे यांनी शिवसेनेवर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…आता मराठा बांधवांनीही मुस्लिमांच्या आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा !

News Desk

नांदगाव परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राची राख तातडीने उचलावी! – आदित्य ठाकरे

Aprna

नवाब मलिकांच्या राजीनाम्यांसाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांचे आंदोलन

Aprna