HW News Marathi
महाराष्ट्र

विंदांच्या जन्मशताब्दी निमित्ताने….!

गौरी टिळेकर | गोविंद विनायक करंदीकर उर्फ महाराष्ट्राचे लाडके ‘विंदा करंदीकर’ ! विंदा हे मराठीतील प्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ साली कोकणातील देवगड येथे झाला. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात देखील ते सहभागी झाले होते आणि त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. कोकणाच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते कायमच संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा विंदांचा वैचारिक प्रवास राहिला आहे. एवढे असूनही ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत हे विशेष.

लेखन अधिक जिव्हाळ्याचे

सुरुवातीच्या काळात आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अध्यापनाचे काम स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. परंतु लेखन ही त्यांच्यासाठी अधिक जिव्हाळ्याची गोष्ट होती. त्यामुळे केवळ लेखन करण्यासाठी त्यांनी इ.स. १९८१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली.

सन्मान आणि पुरस्कार

विंदांच्या ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी त्यांना देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ३९वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.

  • कबीर सन्मान
  • कवी कुसुमाग्रज पुरस्कार
  • कुमारन् आसन पुरस्कार
  • केशवसुत पुरस्कार
  • कोणार्क सन्मान
  • जनस्थान पुरस्कार
  • भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार
  • महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार
  • विद्यापीठांच्या डी.लिट्‌स
  • डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार
  • साहित्य अकादमी महत्तम सदस्यता
  • सीनिअर फुलब्राइट फेलोशिप
  • सोव्हिएट लॅन्ड नेहरू लिटररी पुरस्कार
  • ज्ञानपीठ पुरस्कार

विंदा करंदीकर यांच्या पत्‍नी सुमा करंदीकर यादेखील लेखिका होत्या. विंदांना इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते.

विंदांच्या कविता

विंदाच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि कोमलता, स्वछंदीपणा आणि संयम, निरागसता आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा या सर्व भावनांचा प्रत्यय येतो, हेच त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य! त्यांच्या कविता मनाचा ठाव घेतात आणि आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. नेमक्या मानवी भावना अचूकपणे टिपणारे त्यांचे शब्द आणि कविता अगदी जवळच्या वाटत. त्यांच्या कवितेत भान हरपवण्याची ताकद आहेच पण तेच आपल्याला भानावरही आणतात. विंदांच्या बालकविताही अत्यंत प्रसिद्ध आहेत. विंदांच्या काही सुप्रसिद्ध कविता

काव्यसंग्रह

  • संहिता (१९७५) (संपादन – मंगेश पाडगावकर)
  • आदिमाया ( १९९०) (संपादन – विजया राजाध्यक्ष)
  • स्वेदगंगा इ.स. (१९४९)
  • मृद्‌गंध इ.स. (१९५४)
  • धृपद इ.स. (१९५९)
  • जातक इ.स. (१९६८)
  • विरूपिका इ.स. (१९८१)
  • अष्टदर्शने इ.स. (२००३) या साहित्यकृतीकरिता पुरस्कार प्रदान

बालकविता संग्रह

  • राणीची बाग
  • एकदा काय झाले
  • सशाचे कान
  • एटू लोकांचा देश
  • परी ग परी
  • अजबखाना
  • सर्कसवाला
  • पिशीमावशी आणि तिची भुतावळ
  • अडम्‌ तडम्
  • टॉप
  • सात एके सात
  • बागुलबोवा

विंदा त्यांच्या वैयक्तिक जीवनात अत्यंत साधेपणाने आणि स्वाभिमानाने जगले. काटेकोरपणाबद्दल मात्र त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. “सतत नाविन्याचा शोधात असणारे विंदा हे कायमच आपले वेगळेपण जपत. त्यांनी कधीही भाषणबाजी केली नाही. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे. तसाच एक तत्त्वचिंतकही आहे.” उद्गार ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी काढले होते. महाराष्ट्राच्या लाडक्या विंदांचे मराठी साहित्यातील योगदान हे अपूर्व आणि अमूल्य आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर शहरात मृत्यू झालेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

Aprna

समर्थकांचे राजीनामा सत्र, पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

News Desk