HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश केल्यास कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत – विनोद पाटील

औरंगाबाद | राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना आता मराठा नेते विनोद पाटील यांनी एक महत्वपूर्ण आणि मोठे वक्तव्य केले आहे. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश झाल्यास आम्हाला आनंदच होईल. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाही, असा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. विनोद पाटील यांच्या या भूमिकेमुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विनोद पाटील यांनी आज (२५ मे) औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले आहे. मराठा समाज हा पूर्वीपासूनच कुणबी म्हणून ओबीसीमध्ये समाविष्ट आहे. विदर्भ, खानदेश आणि कोकणात मराठा कुणबी समाजाचा ओबीसीत समावेश झाला आहे. त्यामुळे इतर मराठा समाजाचाही सरकार जर ओबीसीत समावेश करणार असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यामुळे कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. किंबहुना तसे होऊ न देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे विनोद पाटील यांनी सांगितले आहे.

‘ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, अन्यथा गंभीर परिणाम होतील’

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आले आहे. ओबीसी महासंघाने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा. अनेक ठिकाणी 19 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महांसघाने दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्टक …पावसाचं कमबॅक ?

News Desk

‘राहुल गांधींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप’

News Desk

मुख्यमंत्र्यांचा अनादर तेही अशा टॉम, डिक आणि हॅरी करून हे स्वीकारार्ह नाही!

News Desk