HW News Marathi
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : भाजपकडून तावडे, मेहतासह पुरोहित यांना घरचा रस्ता

मुंबई | भाजपने उमदवारांची चौथी यादी आज (४ ऑक्टोबर) जाहीर करण्यता आली आहे. भाजपच्या चौथ्या यादीत ७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडेस यांना उमेदवारी मिळालेली नाही. एकनाथ खडसे यांच्यऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

प्रकाश मेहता यांचे एसआरए घोटाळ्यात नाव आल्याने त्यांना डावलण्यात आले असून त्यांच्या जागी घाटकोपर पूर्वमधून नगरसेवक पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुलाबा मतदारसंघातून पुरोहित यांच्याऐवजी विधानपरिषदेचे सभापती व राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट झाला असून यांच्या बोरीवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने पहिल्या यादीत १२५ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत १४ उमेदवारांचा समावेश होता. तर तिसऱ्या यादीत ४ उमेदवार घोषित केले आहेत. तसेच भाजपने चौथ्या यादीत ७ उमेदवारांची घोषणा घेतली आहे. या चारही याद्या मिळून भाजपने आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी १५० उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. भाजपने विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना उमेदवारी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

News Desk

मुंबई डबेवाल्यांच्या मदतीला रोहित पवार पुढे सरसावले

News Desk

विधानसभेत फडणवीसांचा व्हिडिओ बॉम्ब, राज्य सरकारवर गंभीर आरोप

Aprna