HW News Marathi
Covid-19

पुण्यातील हिंजवडी येथे विप्रोने उभारले कोरोना आरोग्य केंद्र

पुणे | कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. आज ( ११ जून) पुण्यातील हिंजवडी येथे विप्रो कंपनीने सरकारसोबत एका महिन्यात अद्ययावत कोरोना आरोग्य केंद्र उभे केले आहे. यात ५०४ बेड, १८ व्हेंटिलेटर, २ अद्ययावत रुग्णवाहिकेसह सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या रुग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विप्रोने सरकारसोबत येऊन केलेल्या या वेगवान आणि दर्जेदार कामाबद्दल त्यांचं कौतुक केलं.

“विप्रोने यासाठी १.८ लाख स्क्वेअर फुट इतकी आयटीची इमारत दिली आहे. ५ मेला करार करून अवघ्या महिना सव्वा महिन्यात त्यांनी ती आम्हाला दिली आहे. विप्रो सामाजिक कार्यात सुद्धा किती वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने काम करते याचे हे रुग्णालय प्रतिक आहे. मी यासाठी रिशद प्रेमजी यांचे मन:पूर्वक आभार मानतो,” असे मुख्यंत्र्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक आरोग्य संघटनेवर संपूर्णपणे चीनचे नियंत्रण, WHO सोबतचे अमेरिकेने संबंध तोडले | डोनाल्ड ट्रम्प

News Desk

आयटी कर्मचारी आता थेट पुढच्याच वर्षी ऑफिसला जाणार 

News Desk

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून पत्र लिहित सांत्वन

News Desk