HW News Marathi
Covid-19

Virafin औषधाला भारतात परवानगी ! कोरोनारुग्णांचा रिपोर्ट ७ व्या दिवशी  निगेटिव्ह 

मुंबई । संपूर्ण जगासह आपला देशही वर्षभराहून अधिक काळ कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढत आहे. देशात एकीकडे लसीकरण सुरू आहे. दुसरीकडे कोरोनाबाधितांचा प्रमाणाबाहेर वाढत जाणारा आकडाही धडकी भरवणारा आहे. मात्र, या स्थितीतही देशासाठी आता एक सकारात्मक बातमी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी आता लवकरच देशात Zydus Cadila या कंपनीच्या Virafin या औषधाचा वापर होणार आहे. DCGI अर्थात Drugs Controller General of India कडून देशात या औषधाच्या वितरणाला मान्यता मिळाली आहे. Virafin या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Virafin दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असून हे औषध दिल्यानंतर ७ व्या दिवशी कोरोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत आहे. त्याचप्रमाणे, रुग्ण लवकर बरे होत असल्याने कृत्रिम ऑक्सिजनची गरजही कमी होते, असा दावा Zydus Cadila कंपनीकडून करण्यात आला आहे. Zydus Cadila या कंपनीने जाहीर केलेल्या निकालांनुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचे प्रमाण तब्बल ९१.१५ टक्के आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोजगार मिळवून देणाऱ्या या कंपनीतून ९६० कर्मचारी गमावणार आपलीच नोकरी

News Desk

राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे १५००च्या आसपास रुग्ण, राजेश टोपेंच्या केंद्राकडे ३ महत्वाच्या मागण्या

News Desk

वाधवान कुटुंबीयाचा क्वॉरंटाइन पिरियड आज संपणार, अनिल देशमुखांची माहिती

News Desk