HW News Marathi
महाराष्ट्र

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट झाली व्हायरल

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल (७ जुलै) जम्बो विस्तार झाला आहे. महाराष्ट्रातून ४ जणांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. परंतु, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. त्यामुळे मुंडे समर्थक कमालीचे नाराज झाले आहे. ‘ही तर फक्त सुरुवात आहे..’असं म्हणत समर्थकांनी आपल्या भावना पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे किती योगदान होते, हे ठणकावून सांगण्यात आले आहे. ही पोस्ट पंकजा मुंडे यांचासाठी काम करणाऱ्या माजी सहकारी संकेत सानप याने लिहिली आहे.

तसंच, ‘तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही. हे सारं प्रस्थापित शक्तीकेंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही. एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो? राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन दोन गोपीनाथ मुंडे. आज आपल्या पंकजाताईचं वय 42 आहे तर प्रितमताईंचं 38,असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे’ असं म्हणत समर्थकांनी भावनिक सादही यावेळी घातली आहे.

काय आहे पोस्ट ?

२४-२५ मे २०१४ ,खा.गोपीनाथ मुंडे यांचा मोदी मंत्रीमंडळात समावेश होणार नाही अशा चर्चा.

हो हो नाही नाही करत अखेर साहेबांचा शपथविधी झाला.लोक आनंदाने वेडेपिसे झाले. रड रड रडले. आज प्रीतमताईंचा समावेश झाला असता तर जवळपास तेच चित्र राज्यभर पहायला मिळालं असतं !

असं का झालं नसेल बर !

कुरघोडींचं राजकारण की अजून काही ?

आठवतो का तुम्हाला मुंडे भगिनींचा प्रवास ?

• पुन्हा संघर्ष यात्रेस गावोगावी अभुतपुर्व प्रतिसाद ,भगवानगडावर २०१४ साली लाखोंचा भावनिक समुदाय ऊरात धडकी भरवणारा.

• २०१४ साली मुंबईत मंत्रिमंडळात तुमच्या नावाची घोषणा होताच उपस्थित सर्व महामहीमांपेक्षा अधिक प्रतिसाद.

• २०१४ लोकसभा पोटनिवडणुकीत सर्व विक्रम मोडणारं मताधिक्य..

• २०१७ साली देशाचं लक्ष वेधणारी गोपीनाथगड-भगवानगड रॅली.

• स्वपक्षीयांनी षडयंत्रं करुनही दरवर्षी भगवानभक्तीगडावर लाखोंचा समुदाय आणि चर्चा फक्त तुमच्याच दसरा मेळाव्याची.

• लोकसभेच जातवार जनगननेची मागणी करताना तुम्ही वडिलांप्रमाणेच वंचित शोषितांचा आवाज बनण्याची चुणूक दाखवता.

• तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही.

अरे लेकरांनो,हे सारं प्रस्थापित शक्तीकेंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही. एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो?

राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन दोन गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे हवे आहेत जनसामान्यांना कधीही उपलब्ध असणारे, कुठल्याही अटीशिवाय फोनवर कामं करणारे, अर्ध्या रात्री फोन उचलणारे. मुलगामी विचारांच्या पक्षात राहून लोकगामी नितींचा अवलंब करत राजनिती करणारे…अन्याय दडपण वेदना सोसत पक्षाशी निष्ठा जपत जपत वंचित पीडित शासित शोषितांच्या ‘वेदना आणि वाणी’ सोबत अधिक प्रखर निष्ठा जपत विरोधकांशी थेट भिडणारे…

आज आपल्या पंकजाताईचं वय ४२ आहे तर प्रितमताईंचं ३८,असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे.

ही तर सुरुवात आहे…!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होता, सोमय्यांवरील कारवाईवर फडणवीसांचे वक्तव्य!

News Desk

राष्ट्रवादीच्या ठाण्यातील उमेदवारांचा अर्ज मागे, मनसेला पाठिंबा

News Desk

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी तातडीची मदत जाहीर!

News Desk