HW News Marathi
महाराष्ट्र

संजय मंडलीक गटाला धक्का ! विरेंद्र मंडलीक यांचा पराभव

कोल्हापूर । गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून सतेज पाटील यांनी हा विजय खेचून आणला आहे. गोकुळमध्ये परिवर्तन होणार याची जोरदार चर्चा राज्यभर रंगली होती. अखेर सतेज पाटील गटाला ते साध्य झाले आहे. दरम्यान, मंडलीक गटाला ह्यात मोठा धक्का बसला असून खासदार संजय मंडलीक यांचा मुलगा विरेंद्र मंडलीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून गोकुळ दुधसंघावर महाडिक गटाची सत्ता होती. मात्र, आता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी ही सत्ता मिळवली आहे. या दोन्ही नेत्यांनी खरंतर गोकुळला मल्टिस्टेट होऊ न देण्याचा निर्धारच केला होता. या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले. अखेर या निवडणुकीत पाटील गटाचेच नाणे वाजले आहे.

आज (४ मे) दिवसभर मतमोजणी सुरु होती. मात्र, आता शेवटी निकाल स्पष्ट झाला आहे. गोकुळ दूधसंघातील महादेवराव महाडिक गटाच्या तब्बल ३ दशकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. येथील एकूण २१ जागांपैकी तब्बल १७ जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर महाडिक गटाला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडले, फडणवीसांची टीकास्त्र

Aprna

Tauktae Cyclone : नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या, नसीम खान यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

News Desk

“ते म्हणतात सरकार चालून तर दाखवा म्हणजे आत्ता आम्ही रांगतोय का? – मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाला पलटवार

News Desk