HW News Marathi
Covid-19

घरपोच मद्यसेवा निर्णयाची अंमलबजावणी १५ मेपासून होणार

मुंबई | कोविड -19 चा संसर्ग जगभरासह देशात आणि राज्यात वाढला असल्याने २२ मार्चपासून देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुखेरीज सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र ४ मेपासून किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्या (१५ मे) रोजी सकाळी १० वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

सदर निर्णय राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम १३९ अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश ११ मे रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी १४ पासून सकाळी १० वाजल्यानंतर करण्यात येणार होता. परंतु क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सदर आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळविणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे इत्यादी प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस आवश्यक असल्याने या आदेशाची अंमलबजावणी १५ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे. घरपोच मद्यसेवा ही सोय ज्या जिल्हयात मद्यविक्री सुरु आहे त्या जिल्हयात आणि संबधितजिल्हाधिकारी यांनी मद्यविक्री करीता ज्या वेळा, दिवस आणि क्षेत्र निर्धारित केलेले आहे त्यातच सदर सोय उपलब्ध होऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकारणाचा डोस कमी करून केंद्रानं कोरोनावर लक्ष केंद्रीत केलं असतं तर…”, सेनेचा टोला

News Desk

खासगी रुग्णालयातील सिटी स्कॅनचे दर निश्चित – राजेश टोपे

News Desk

पंतप्रधान मोदींची आज ‘मन की बात’, तर कोरोना आणि पाचव्या लॉकडाऊनसंदर्भात काय बोलणार ?

News Desk