HW News Marathi
महाराष्ट्र

वाडिया रुग्णालय आर्थिक संकटात ३००हून अधिक जणांना डिस्चार्ज

मुंबई | मुंबईतील लहान मुलांचे स्पेशलिस्ट असलेले सुप्रसिद्ध वाडिया रुग्णालय बंद होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज (१३ जानेवारी) लाल बावटा कामगार संघटनेकडून धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनेसेचे नेते बाळा नांदगावकर सहभागी झाले.

“वाडिया रुग्णालय बंद झाले तर गोरगरिबांनी उपचारासाठी जायचे कुठे? महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. काहीही झाले तरी हे रुग्णालय आम्ही बंद होऊ देणार नाही,” असा सवाल शर्मिला ठाकरेंनी उपस्थित केला आहे. लाल बावटा कामगार संघटनेकडून प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वात वाडिया रुग्णालयाबाहेर तीन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांसह वाडिया रुग्णालयातील कामगार उपस्थित होते.

वाडिया रुग्णालय कुठल्याही परिस्थिती बंद होणार नाही. हे खरे आहे ही रुग्णालयामधील औषधांचा साठा संपत चालला आहे. ज्या रुग्णांवर औषध नसल्याने उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही रुग्णांना आता ऍडमिट करून घेत नाही आहोत. आम्ही ३०० हुन अधिक रुग्णांना आम्ही डिस्चार्ज देण्यात आला आहे. आमचे प्रशासनाशी बोलणे सुरू असून सर्वच अनुदान मिळाले तर रुग्णांना उपचार देणे शक्य होणार असल्याचे वाडिया रुग्णालयाची सीईओ मिनी बोधनवाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्य सरकार आणि महापालिकेकडे निधी रखडला

वाडिया रुग्णालयाचा २२९ कोटींपेक्षा अधिक निधी राज्य सरकार आणि महापालिकेकडे रखडला आहे. गेल्या काही दिवसांत पालिकेने रुग्णालय प्रशासनाला १३ कोटी निधी दिले. मात्र, या तुटपुंज्या निधीत रुग्णालय चालवणे अवघड असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक विभागांमधल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शस्त्रक्रियादेखील रद्द केल्या आहेत. यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे हाल होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या बाबतीत आज मुख्यमंत्र्यांची MMRDA सोबत बैठक होणार

News Desk

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच नयेत; प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणुका घ्या

Aprna

“मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुम्ही फ्लॉप होणार,” नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna