HW News Marathi
महाराष्ट्र

वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही !

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हणाल्या की, “वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही. मात्र चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष, जागो महाराष्ट्र !” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. अमृता फडणवीस यांनी इकोनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी हे ट्विट केले आहे.

महाविकासआघाडीचे सरकार येताच महाराष्ट्र पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स अॅक्सिस बँकेतून राष्ट्रीयकृत बॅकेकडे वळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस खात्यातील २ लाख कर्मचाऱ्यांची सॅलरी अकाऊंट अॅक्सिस बँकेत आहेत. पोलिसांच्या खात्यातून अॅक्सिस बँकेत वर्षाला ११ हजार कोटींची उलाढाल होते. मात्र, हे पोलीस खातेदार अॅक्सिस बँकेला गमवावे लागू शकतात, अशी माहिती मुंबई मिरर वृत्तपत्राने दिली होती. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी इकोनॉमिक्स टाइम्सची एक बातमी रिट्विट करत अमृता यांनी “वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही. मात्र चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष, जागो महाराष्ट्र !” असे म्हटले आहे.

यापूर्वी अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राहुल गांधीच्या सावरकरांच्या निंदनीय आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असं ट्वीट फडणवीसांनी केले होते. फडणवीस यांच्या ट्वीटला त्यांची पत्नी अमृता फडणवीसांनी रिट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “खरे आहे देवेंद्र फडणवीसजी. त्याचप्रमाणे ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावे लागते. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असे ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केले होते.

वर्षा बंगल्याच्या भिंतीवर काय लिहिले

वर्षा बंगलाच्या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स असे लिहण्यात आले आहे. तसेच हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत…? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. ‘यूटी’ म्हणजे नेमके कोण?; यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत. तरी उद्धव ठाकरे यांच्या नावाचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप ‘यूटी’ असे होते. त्यामुळे हे त्यांनाच उद्देशून असल्याचे तर्क काढले जात आहे. मात्र, ते नेमके कोणी लिहिले आहे, व्हिडिओ कोणी चित्रण केला आहे, याबाबत मात्र कोणतीही सध्या माहिती समोर आलेली नाही.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संदीप देशापंडेंनी ‘या’ घटनेवर दिले स्पष्टीकरण

Aprna

भाजप प्रवेशानंतर आता उदयनराजे महाजनादेश यात्रेसाठी सज्ज

News Desk

“मी पोहोचलो रे हिमालयात”; महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

Manasi Devkar