HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत एकट्या ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ५३४ कोरोनाबाधित, ‘ही’ आहे वॉर्डनिहाय आकडेवारी

मुंबई | देशातील कोरोनाबाधितांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक आहे. त्यातच महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या चिंतेचा विषय आहे. सध्या राज्यात एकूण ६४२७ तर मुंबईत एकूण ४२०५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये सध्या सर्वाधिक कोरोनाबाधितांचा नोंद झालेली असताना आता मुंबईसाठी आणखी एक चिंताजनक बातमी आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची वॉर्डनिहाय आकडेवारी लक्षात घेतली तर वरळी, लोअर परळ, करी रोड परिसरांचा समावेश होणाऱ्या ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधितांचा आकडा सर्वाधिक ५३४ वर पोहोचला आहे. तर शहरातील ५ वॉर्डमध्ये ३०० पेक्षा अधिक, ९ वॉर्डमध्ये प्रत्येकी २०० पेक्षा अधिक, १५ वॉर्डमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत इतर ४ वॉर्ड देखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.

मुंबईतील कोरोनाबाधितांची वॉर्डनिहाय आकडेवारी, कंसात कोरोनमुक्त रुग्णांची संख्या

जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड – 534 (82)

– भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडी बंदर – 421 (31)

एल – चुनाभट्टी, कुर्ला – 312 (40)

के पश्चिम – अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा– 311 (11)

एफ उत्तर– सायन, माटुंगा, वडाळा – 305 (19)

जी उत्तर – माहिम, धारावी, शिवाजी पार्क – 296 (22)

डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 253 (34)

के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व – 229 (46)

एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 215 (17)

एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 184 (17)

एफ दक्षिण – परळ, शिवडी – 144 (10)

– कुलाबा, कफ परेड , फोर्ट – 127 (14)

एम पश्चिम – चेंबुर – 122 (3)

एस – भांडूप, नाहूर, कांजुरमार्ग, विक्रोळी– 116 (19)

पी उत्तर –मालाड – 106 (21)

मुंबईत १०० पेक्षा कमी कोरोनाबाधित असलेले वॉर्ड्स

एच पश्चिम – 97 (14)

एन – 94 (11)

आर दक्षिण – 85 (14)

पी दक्षिण – 84 (16)

बी – 68 (8)

आर मध्य – 44 (10)

सी – 30 (5)

टी– 29 (3)

आर उत्तर – 26 (6)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंची केंद्रात वर्णी ,कसा आहे राणेंचा राजकीय प्रवास ?

Jui Jadhav

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

News Desk

संसदीय अधिवेशनाच्या काळात दिल्लीत शरद पवारांसह विरोधकांची ‘चाय पे चर्चा’

News Desk