HW News Marathi
महाराष्ट्र

वर्ध्यात प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी विकी नगराळेला अटक

वर्धा | वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये मानवतेला काळीमा फासणार घडना घडली आहे. एका प्राध्यापक तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला बुट्टीबोरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव विक्की नगराळे (२७ वर्ष ) असून त्याला वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंगणघाट प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांना दिले.

हिंगणघाट शहरात आज (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर स्वार आलेल्या तरुणाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तरुणी आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले. त्यानंतर तिच्यावर जवळील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आणि नंतर तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल केले. ही घटना एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात पीडित तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळाला असून तिची वाचाही गेल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? सेना- काँग्रेसमध्ये नामंतरावरून वाद 

News Desk

मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही !

News Desk

“डॉ.आंबेडकर समाज भूषण पूरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार”- धनंजय मुंडे

News Desk