मुंबई। महापुरानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह अनेक भागांत सध्या मुसळधार पावसाच्या सरी बसरत आहेत. तर काही भागांत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील धरण क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत संततधार पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र येत्या १ ते २ दिवसांत महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवला आहे.
सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि संपूर्ण राज्यभर ४८ तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.हवामान खात्याच्या अंदानुसार, १७ ऑगस्टला औरंगाबाद, जालना, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर १८ ऑगस्टला नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
येत्या 1-2 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे .
अधिक माहिती साठी प्रादेशिक मौसम केंन्द्र , मुंबई संकेत स्थळाला भेट ध्या .https://t.co/JYmdPo98tJ pic.twitter.com/ANueIcFDUv— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 17, 2021
तर काही भागात महाराष्ट्रातही हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय मुंबईतही गेल्या चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. बोरिवली, कांदिवली, वांद्रे, माहिम, माटुंगा, सांताक्रुझ भागांत आजही हलक्या पावसाने हजेरी लावली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.