HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरेंची घेतली भेट!

मुंबई। गेल्या दोन दिवसांपासून तालिबान्यांनी अफगाणिस्थानमध्ये नागरिकांचं जगणं हे असह्य केलं आहे, आणि अफगाण ताब्यात घेतल्यानंतर जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यात सुद्धा शिक्षणासाठी आलेल्या 3 हजाराहून अधिक अफगानी विद्यार्थ्यांचा जीव धाकधुकीत आहे. आणि याच विद्यार्थी आज मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, या मुलांना महाराष्ट्रात काही त्रास होणार नाही याची खात्री घेतली जाईल’ असं आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिलं.

पुण्यात शिकणाऱ्या अफगाणिस्थान मधल्या विद्यार्थ्यांनी घेतली भेट

पुणे विद्यापीठात शिकणारे अफगाणिस्थानातील विद्यार्थ्यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात भेट घेतली. पुणे विद्यापीठाअंतर्गत तीन हजारहून अधिक अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अफगाणिस्थानात तालिबानी राजवट आल्यामुळे या विद्यार्थ्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी कोणताही संपर्क होत नाहीये. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

आश्वासन राजशिष्टाचार मंत्र्यांनी दिलं

दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालया मार्फत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करूण दिला जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांची शिक्षण फी राहिली असेल, त्या विद्यार्थ्यांना सवलतही दिली जाईल, असं आश्वासन राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले.’महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येईल. मात्र त्यांच्या पालकांना भारतात आणण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर आपण परराष्ट्र मंत्रालयाशी बोलून मार्ग काढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आश्वासन दिल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार”

News Desk

“त्या महिलेनेच अंगातील झगा काढला”, गृहमंत्र्यांनी जळगाव वसतिगृहात काय घडले ते सांगितलं

News Desk

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

Aprna