पालघर। काँग्रेस पक्ष हा नेहमीच मराठी माणूस आणि हिंदुत्वाला सातत्याने विरोध करतो. त्या काँग्रेसशी हातमिळवणी करून पेढे वाटताना लाज वाटली नव्हती का?; असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेना नेते संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. बेळगावचा पराभव राऊतांच्या जिव्हारी लागला आहे. पण राऊतांनी बेळगावात मराठीचा नारा देऊन चूक केली आहे. पराभव झाल्यानंतर त्यांना पेढे खाल्याचे आठवलं. मला एकच गोष्ट संजय राऊतांना विचारायचं की, ज्या मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना त्यांना लाज वाटली नाही का? काँग्रेसशी हात मिळवणून करून त्यानी हिंदुत्वाचा अपमान केला नाही का?, असा सवाल लाड यांनी राऊतांना केला आहे.
बेळगावचा विजय झांकी है मुंबई अभी बाकी है…
बेळगावचा विजय हिंदूत्वाचं विजय आहे. बेळगावचा विजय मराठी माणसांचा विजय आहे. बेळगावचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय आहे. भाजपला हिंदुत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि मराठी माणसांचा कधी विसर पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. बेळगावचा विजय झांकी है मुंबई अभी बाकी है… भाजपचा विजय आणि शिवसेनेचा पराजय मुंबईला राऊतांना दिसायला लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरारसह इतर ठिकाणीही मराठी माणूस भाजपसोबत खंबीरपणे उभा राहील असं त्यांनी सांगितलं.
जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे
राऊतांनी केलेल्या चुका त्यांना दाखवता राहणार नाही. बेळगावचा निकाल मराठी माणसाचा निकाल आहे. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. पाठीत खंजीर कोणी घुसवला त्यांनाचं माहीत आहे. निवडणूक एकत्र लढून शरद पावरांशी हात मिळवणून कोणी केली हे जगजाहीर आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
संजय राऊत यांची भाजपवर टीका
दरम्यान, बेळगाव महापालिका निवडणुकीत एकीकरण समितीचा पराभव झाला होता. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली होती. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.