HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’, चर्चा तर होणारच!

जळगाव | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जे आधी अनेक वर्ष भाजपमध्ये होते त्यांच्यातील वाद सगळ्यांना माहित आहे. अशात भाजपला सोड़चिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी हाती घडळ्याळ बांधत राष्ट्रवादीच्या प्रवेश केला. याची चर्चा तर राजकीय वर्तृळात रंगलीच पण आज (१ जून) देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात जात एकनाथ खडसे यांच्या मुक्ताऊनगर येथील घरी जात एक चर्चेला विषय आणखी दिला.

देवेंद्र फडणवीस सध्या जळगाव दौर्‍यावर आहेत. दौर्‍याला सुरुवात करण्‍यापूर्वी त्‍यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या घरी जावून त्‍यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, राजकीय वर्तुळात भेटीपेक्षा खडसे यांच्या घरी लावलेल्या घड्याळाची चर्चा अधिक रंगली आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे.

मुक्ताईनगर दौर्‍यावर येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. एकनाथ खडसे हे भाजपमधून बाहेर पडल्‍यानंतर देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये वितुष्‍ट आले असताना या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. पण अजूनही खडसे यांच्या मनात, हृदयात कुठेतरी भाजपच प्रेम दडलय असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान, आज एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट मात्र झाली नाही आहे.

काय आहे नेमकं कारण?

रक्षा खडसे यांच्या घरातील घड्याळाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे घड्याळ कमळाच्या आकाराचे असून या घड्याळामध्ये एकनाथ खडसे यांचा फोटो आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या खडसेंचा फोटो कमळाच्या आकाराच्या घड्याळामध्ये असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज झालेल्या रक्षा खडसे आणि फडणवीस यांच्या भेटीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत कमळाच्या घड्याळ्याची चर्चा अधिक रंगली आहे.

खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘ शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले नसते तर माझे राजकीय करिअर संपुष्टात आले असते’, असे त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले होते.

एकीकडे फडणवीस खडसे यांचा वाद, आज फडणवीसांनी जळगावात जात खडसेंच्या घरी जात घेतलेली सदिच्छा भेट आणि त्यानंतर खडसेंच्या घरातील ते कमळावरचे घड्याळ या सगळ्या विषयांवर पुन्हा एकदा नव्याने चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. यावर खडसे स्वत:किंवा सरकारमधील मंडळी किंवा भाजप नेते यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

News Desk

नवाब मलिकांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

मुंबईच्या पावसाचे दोन बळी, तिघे बेपत्ता

News Desk