HW News Marathi
महाराष्ट्र

जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी बीड जिल्ह्यात केली अतिवृष्टीची पाहणी!

मुंबई। जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या बीडच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, बीडमध्ये पावसानं थैमान घातल्याने त्यांचं संपूर्ण नियोजनच चुकलं आहे. त्यामुळे त्यांनी कामाचा झपाटा लावला आहे. दिवसभर अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी, शेतकऱ्यांशी चर्चा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू करत रात्री साडे दहा वाजता जलसंपदा विभागाची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला.

जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ होईल

बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात च्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल . जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (दि. २८ )रात्री उशिरा बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या शिरसाठ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणेे, जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यासह महसूल जिल्हा परिषद जलसंपदा विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले जल सिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढ गरजेचे आहे , जिल्ह्यातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी साठवण प्रकल्पांचे उंची वाढविण्यासाठी प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा विचार करून निर्णय घेऊ. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाड्यात ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले

जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांचा दुरुस्ती कामांचा आढावा

यावेळी जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यांसह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.याप्रसंगी शेती साठी पाण्याचे समान वाटप, सिंदफना, माजलगाव आदी प्रकल्पांसह जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांचा दुरुस्ती कामांचा आढावा आणि निर्माण झालेले अडथळे दूर करून कामे तात्काळ सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आलेे.

जिल्ह्यातील जलप्रकल्पांची सद्यस्थिती बाबत माहिती

यावेळी त्यांनी प्रकल्पाविषयी लोकप्रतिनिधींच्या सुचना विचारात घेवून योग्य ते निर्देश देवून ज्यांना कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्यासाठी त्या कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.बैठकीत सुरुवातीला जलसंपदा विभागाच्या वतीने माहिती सादर करण्यात आली जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची माहिती, पुर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती, कामे सुरू प्रकल्पांची सर्वसाधारण माहिती, प्रस्तावित प्रकल्पांबाबत, जिल्ह्यातील प्रकल्पांद्वारे निर्मित सिंचन क्षमता, चालू वर्षातील उपलब्ध आर्थिक तरतूद व आवश्यक निधी, जिल्हातील प्रकल्पात असलेला पाणीसाठा, जिल्ह्यातील जलप्रकल्पांची सद्यस्थिती बाबत माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत बीड जिल्ह्यातील परळी अंबाजोगाई व केज तालुक्यातील विविध गावात अतिवृष्टीग्रस्त भागांची दौरा दरम्यान पाहणी केली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागात सुरू मदत कार्याची माहिती दिली तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी व पूर पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

12.30 वाजता मेहबूब शेख यांच्या घरी भेट व भोजन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपल्या शिरूर कासार येथील निवासस्थानी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. उशीर झाला म्हणून बीडवरून शिरूर कासार येथे जाणे शक्य नव्हते. मात्र कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पाटील शिरूरकासार येथे गेले. रात्री 12.30 वाजता ते शेख यांच्या निवासस्थानी पोहोचले. शेख यांच्या घरी भोजन घेतल्यानंतर रात्री 2 वाजता ते तिथून नगरच्या दिशेने निघाले. पहाटे 5 वाजता ते अहमदनगर जिल्ह्यात पोहोचले आणि नगरमध्ये गेल्यावर पुन्हा बैठकांना सुरुवात केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ म्हणाले हा… पवारांचे मिश्किल उत्तर

News Desk

परळीत माझा फार्म हाऊस नाही आणि महाल ही नाही; पंकजा मुंडेंची थेट धनंजय मुंडेंवर टीका

Aprna

फडणवीसांचे राजकारण इतके खुनशी असेल असे वाटले नव्हते – अमोल मिटकरी

News Desk