मुंबई | “आमरावतीची परिस्थिती नियंत्रित कशी ठेवायची, आणि शांतता कशी राखायची यावर लक्ष केंद्रीत करत आहोत, असे आवाहन दिलीप वळसे-पाटील यांनी जनतेला केले आहे. आम्ही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलत आहोत असून राज्यात शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंत केल्यांची माहिती वळसे पाटील यांनी आज (१३ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना सांगितलं.
त्रिपुरा हिंसाचाराचं निषेदार्थ अमरावतीत काल (१२ नोव्हेंबर) काल रॅली काढली होती. परंतु रॅलीत जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे हिंसक वळण आलं. या पार्श्वभूमीवर आज अमरावतीत जमावानं रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी आणि दगडफेक केली. यात जमावांनं तोडफोड करताना जय भवानी आणि जय शिवाजीच्या घोषणा देत तोडफोड करून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
We condemn the violence. I spoke to Devendra Fadnavis, Amravati MP to help maintain social harmony and peace. We are focusing on how to keep the situation under control and maintain peace: Maharashtra HM Dilip Walse Patil on violence in rallies at Amravati, Nanded and Malegaon pic.twitter.com/sBFDlerona
— ANI (@ANI) November 13, 2021
नेमके काय आहे प्रकरण
त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित हिंसाचार पार्श्वभूमीवर राज्यात विरोध दर्शविणारी रॅली काल ( १२ नोव्हेंबर) काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणींनी दुकानांची तोडफोड केली तर काही दुकानं जबरदस्तीने बंद करण्यात आली. राज्यातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती या ठिकाणी रॅलीला हिंसक वळण आलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.