HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु – हेमंत नगराळे

नागपूर | राज्यात सध्या एकच विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे तो म्हणजे पूजा चव्हाणच्या आत्महत्येचा आणि त्यात समोर आलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांचा. दरम्यान, भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते आज (२५ फेब्रुवारी) नागपूर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. या तपासाविषयी मला सर्व गोष्टी जाहीर करता येणार नाहीत. मात्र, पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. पोलिसांचा तपास हा तथ्यावर चालतो. जर तरच्या शक्यतांवर पोलीस तपास चालत नाही, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी असे कोणतेही भाष्य करणार नाही, ज्याच्यावरुन तुम्ही नवे अंदाज बांधाल, असे नगराळे यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ गुरुवारी पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्यात पूजा चव्हाण प्रकरणाच्या तपासाची प्रगती पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वरिष्ठ PI दीपक लगड यांनी मग्रुरी दाखवल्याचा आरोप वाघ यांनी केला. यावर भाष्य करताना हेमंत नगराळे यांनी हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले. आज पुण्यात काय घडले मला ते माहीत नाही. मात्र, प्रत्येक नागरिकाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असल्याचे हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणीदेखील वाघ यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुणे पोलीस दलाल असल्याचे वक्तव्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एस.टी. कर्मचारी संपास आणि प्रवाशांच्या होणार्‍या  त्रासास राज्य सरकारच जबाबदार- धनंजय मुंडे

News Desk

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात

News Desk

अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका – शरद पवार

News Desk