HW News Marathi
महाराष्ट्र

“….आम्ही दहीहंडी फोडणारच” राम कदम यांची आक्रमक भूमिका!

मुंबई। कोरोनामुळे मागील वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर दहीहंडी उत्सवासाठी परवानगी नाकारली. यावरुन राजकारण तापले असून भाजप आमदार राम कदम चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. दहीहंडी उत्सव अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला असताना ‘महाराष्ट्र सरकारने नियम आखून परवानगी दिली तर स्वागत आणि नाही दिली तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणाचं’, असा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी सरकारला दिला आहे.

कितीही फतवा काढला कितीही रोखले तरीही दहीहंडी उत्सव साजरा होणार

हिंदू धर्माचे सण आम्ही साजरे करणारच. स्वत:घरात बसून हिंदूनी काय करावे आणि काय करु नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही’, असा टोला राम कदम यांनी सरकारला लगावला आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी उत्सावाच्या आयोजनाची परवानगी नाकारली. त्यानंतर राम कदम यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका करत आयोजक नात्याने घाटकोपर येथील दहीहंडी उत्सव साजरा करणार. सरकारने कितीही फतवा काढला कितीही रोखले तरीही दहीहंडी उत्सव साजरा होणार,असा इशारा दिला होता.

हिंदू बांधव ऐकणार नाही

‘बियर बार दारुचे ठेले सुरू करता. त्यांच्यासाठी नियम बनवा. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचे स्वागत करू. पण नियम बनवणार नसाल आणि एसी बंगल्यात बसून दहीहंडी साजरी करू नका असे सांगाल तर हिंदू बांधव ऐकणार नाही. तो दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणार, असे देखील राम कदम यांनी म्हटले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटीची संप अटळ, एसटी संघटनांची मुख्यमंत्र्यां बरोबरची चर्चा फिसकटली

News Desk

लोकल कधी सुरू होणार? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न

News Desk

“पूरग्रस्त भागातील दौरे टाळा”, शरद पवारांचं नेत्यांना आवाहन

News Desk