HW News Marathi
Covid-19

पुण्यात वीकेंड लॉकडाऊन, तिसरी लाट थोपवण्याचा निर्धार ! | अजित पवार

पुणे। पुणेकरांसाठी आता अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार रविवारी सर्वच बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. अजित पवार यांनी निर्बंध अजून कठोर करण्याचा इशारा देताना विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जाईल असं सांगितलं आहे. तसंच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना लशीचे दोन वेगवेगळे डोस घेऊ नये असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले अनेक जण राज्याच्या बाहेर फिरायला जात आहे त्यांना आल्यानंतर (१५) दिवस क्वारन्टाईन करावं लागेल असा सल्ला तज्ञांनी दिलाय.

…तर ह्या पुणेकरांना करावं लागेल क्वारंटाईन !

कोरोना संकट आता काहीसं कमी होत असलं तरी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शनिवार रविवार दुकान बंद राहण्याचा निर्णय घेतलाय तर सोमवार आणि शुक्रवार दुकान सुरू राहतील परिस्थिती खूप खराब झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना कमी होऊ लागला असला तरीदेखील रत्नागिरी, रायगड, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी सध्या तरी प्रमाण जास्त आहे. अशी माहिती विकेंड लॉकडाऊनची घोषणा करताना अजित पवारांनी दिली.

लोणावळा महाबळेश्वर या पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी रविवारी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं तर नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे म्हणून पुण्याबाहेर जी लोक जातील त्यांना पंधरा दिवस क्वारंटाइन करावे लागेल असा सज्जड दमच अजित पवारांनी पुणेकरांना दिलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus: आज राज्यात १५७६ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

“पुण्यात सध्या तरी लॉकडाऊन नाही”, अजित पवारांनी सांगितलं कारण

News Desk

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण

News Desk