HW News Marathi
देश / विदेश

ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक वर दाखल झाल्या आहेत. या बॅनर्जी आणि पवार यांची आज (१ डिसेंबर) भेट ही राजकीय दृष्ट्या महत्वाची असल्याचे मानले जाते. कारण ममता बनर्जी यांना शरद पवार यांच्या उंचीचा अनुभव आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

“ज्या पद्धतीने महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आणि एनसीबी हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचे महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्येही करत आहेत, असे मी कालच्या भेटीत दीदींना सांगितलं”, असे राऊत म्हटले.

या बैठकीत राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर आदी नेते देखील उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे तोंड बंद !

News Desk

ममता बॅनर्जींच्या अधिकाऱ्याचा मुलगा ‘कोरोना’बाधित

News Desk

व्यंकय्या नायडू यांचा राजीनामा, स्मृती इराणी यांच्याकडे पदाभार

News Desk