मुंबई। देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे गेल्या अडीच महिन्यापासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन आजपासून (१५ जून) सुरू होणार आहे. पण,या लोकल ट्रेनमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गांवर आजपासून लोकल ट्रेन धावणार आहेत.
Western Railway to run 73 pairs of suburban services incl 8 pairs b/w Virar&Dahanu Road.Central Railway,will run200 services (100 up&100 down)-130 services from Chhatrapati Shivaji Terminus (CSMT) to Kasara/Karjat/Kalyan/Thane&70 services from CSMT to Panvel: Western Railway PRO
— ANI (@ANI) June 14, 2020
पश्चिम आणि मध्य रेल्वेने काल (१४जून) उशीरा एक संयुक्त निवेदन जारी करून मुंबईत लोकल ट्रेन धावणार असल्याची घोषणा केली आहे. आजपासून तिन्ही मार्गांवर लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.या लोकल ट्रेनमधून फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई कर्मचारी, तसेच उर्वरित पालिका कर्मचारी, पत्रकार या काही ठराविक लोकांना प्रवास करता येणार आहे. सर्व सामान्यांना या लोकलमधून प्रवास करता येणार नाही. तसेच मध्य रेल्वेवर २०० तर पश्चिम रेल्वेवर १३० लोकलच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
तिन्ही मार्गावर अशा धावणार लोकल ट्रेन
चर्चगेटहून विरारपर्यंत लोकल जलद धावतील तर तिथून पुढे धीम्या होणार आहे,असेही पश्चिम रेल्वेकडून नमूद करण्यात आले आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान ७३ फेऱ्या तर चर्चगेट ते डहाणूदरम्यान ८ फेऱ्या दिवसभरात असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर मिळून २०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा, कर्जत, कल्याण आणि ठाण्यासाठी १३० फेऱ्या तर हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून पनवेलसाठी ७० फेऱ्या असतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारचा पाठपुरावा
राज्य सरकार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ट्रेन सुरु कराव्यात, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून आग्रही होती. त्यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर रेल्वेने राज्य शासनाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ट्रेन सोडण्यास परवानगी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.