मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची लाईफलाईन असणारी लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंद असलेली लोकलसेवा अनलॉक प्रक्रियेनंतर केवळ अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू असली तरी लोकलच्या फेऱ्या मात्र मर्यादीत होत्या. दरम्यान, या ट्रेनमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
“२१ सप्टेंबरपासून सोशल डिस्टन्सिंगच्या पार्श्वभूमीवर आणि गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या ३५० वरून ५०० करण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालनं करावे आणि मास्क परिधान करावे,” असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता लोकांच्या अडचणी आणि प्रवास थोडा का होईना पण नक्कीच सुखकर होणार आहे.
The number of daily spl suburban services will be increased from 350 to 500 on WR from 21/9/2020 to maintain social distancing & avoid crowding.
Essential staff as notified by State Govt to travel in local trains is requested to follow social distancing & wear mask during travel pic.twitter.com/iGhzOD41Ib
— Western Railway (@WesternRly) September 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.