HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्यात चुकीचं काय केलं’, अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याच संजय राऊतांकडून समर्थन…!

नवी दिल्ली। अदानी कंपनीने मुंबई एअरपोर्टवर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावल्याने शिवसैनिकांनी हा बोर्ड उखडून फेकला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कृतीचं समर्थन केलं आहे. शिवसैनिकांनी योग्यच केलं. त्यात चुकीचं काय केलं? असा सवाल करतानाच शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

काल पाहिलं ना तुम्ही हे असंच होणार

संजय राऊत यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार प्रसार करत असेल तर शिवसेना सत्तेत असला तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल पाहिलं ना तुम्ही हे असंच होत राहणार, असं राऊत म्हणाले.

काय आहे नेमकं हे प्रकरण

मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध केला असून तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत तिथून हटवला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावले होते. त्याला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला असून नामफलकाची तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी सध्या मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

अदानी समुहाकडे मुंबई विमानतळाचे संचालन

अदानी समुहाने हवाई प्रवास क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठमोठ्या विमानतळांचे संचालन अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यातच मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचलनाची संपूर्ण जबाबदारी अदानी समुहाकडे सोपवण्यात आली होती. समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी ट्वीट करुन याविषयी माहिती दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईची बत्ती गुल झाल्यानंतर आता केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार

News Desk

राबडीदेवी शिवी नाही; चंद्रकांत पाटलांकडून जितेन गजारियांच्या वक्तव्याचं समर्थन

News Desk

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk