नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. मात्र, जितका धक्का या दुर्दैवी घटनेने लोकांना बसला आहे तितकाच संतापही सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (३ ऑक्टोबर) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून परवानगी मिळाली. तब्बल २ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर आज राहुल आणि प्रियांका गांधी पीडितेच्या घरी पोहोचले. यावेळी, पीडितेच्या कुटुंबीयांना मात्र आपले अश्रू अनावर झाले. राहुल आणि प्रियांका गांधींनी यावेळी पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
Only love can bring any semblance of peace to those who are grieving.#SatyagrahaForOurDaughters pic.twitter.com/sL2Db0x5UN
— Congress (@INCIndia) October 3, 2020
प्रियांका यांनी पीडितेच्या घरी जाताच पीडित तरुणीच्या आईची गळाभेट घेतली. यावेळी, प्रियांका यांनाही अश्रू अनावर झालायचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे राहुल गांधींनी देखील पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे, “आम्ही न्यायासाठी संघर्ष करू. तुम्ही एकटे नाहीत. काँग्रेस आणि गांधी कुटुंब तुमच्यासोबत आहेत”, असा विश्वासही राहुल गांधींनी पीडित मुलीच्या कुटुंबाला दिला आहे. जवळपास अर्धा तास राहुल आणि प्रियांका गांधी हे पीडितेच्या कुटुंबियांशी बोलत होते.त्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला.
दर्द में साथ खड़े होना पीड़ित में भरोसा जगाता है।
श्री @RahulGandhi और श्रीमती @priyankagandhi ने हाथरस की बेटी के माँ-पिता और परिजनों से मिलकर उनका दर्द साझा किया।#SatyagrahaForOurDaughters pic.twitter.com/6ek8SeMatr
— Congress (@INCIndia) October 3, 2020
काय आहे पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी ?
‘हाथरस’ पीडितेच्या कुटुंबीयांनी अशी मागणी केली आहे कि, “जिल्हाधिकाऱ्याचे केवळ निलंबन नव्हे तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे, दोषींवरही कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
पीडितेच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर काय म्हणाले राहुल आणि प्रियांका गांधी ?
“जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू”, असे आश्वासन यावेळी राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे. तर, उत्तर प्रदेशचे योगी सरकार हि संपूर्ण परिस्थिती हाताळण्यात आणि पीडित मुलीच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही यावेळी राहुल गांधींनी केली आहे. तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या कि, “आम्ही अन्यायाविरुद्ध लढतच राहणार आहोत. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. आमचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही.”
No power in the world can suppress the family's voice: Congress' Rahul Gandhi after meeting family of the alleged gangrape victim in Hathras. pic.twitter.com/DbtZ0LQVmO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.