HW News Marathi
महाराष्ट्र

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार? संपूर्ण राज्याचं लक्ष

बीड। कोरोनाचे सावट कमी होत असताना राज्यभरात शाळा महाविद्यालय, मंदिरे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी कोरोनाचे नियम पाळून परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा प्रचंड जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सावरगांव येथे हा दसरा मेळावा

येत्या १५ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने ‘आपला दसरा, आपली परंपरा’ जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडेनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. मागील चार वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला भगवान भक्तीगड असे नाव दिले आहे.

त्यामुळे हा मेळावा पुन्हा पहिल्या सारखा पार पडेल

मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे दसरा मेळावा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला होता. यंदा मात्र कोरोनाचे सावट काही अंशी दूर झाले असून मंदिरे उघडली आहेत, शिवाय सर्व जाहीर कार्यक्रम देखील होत आहेत, त्यामुळे हा मेळावा पुन्हा पहिल्या सारखा पार पडेल अश्या जनसामान्यातून प्रतिक्रिया येत आहेत.

पंकजा मुंडे नेमके काय बोलणार?

हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात. संत भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडेना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजा मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. यावर्षी देखील पंकजा मुंडे नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे”,रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप

News Desk

महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता? शिवसेनेचा भाजपला सवाल 

News Desk

“हॅलो, उद्धव ठाकरे बोलतोय, मोदीजी २ मे नंतर बोलतील”, सत्यजित तांबेंचं उपरोधिक ट्विट

News Desk