HW News Marathi
महाराष्ट्र

अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? कॉल रेकॉर्डची चौकशी करा, मोहित भारतीयांची मागणी

मुंबई। राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज मंत्री अस्लम शेख यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचं आयोजन करणारा ड्रग्ज पेडलर काशिफ खान यानं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना पार्टीचं आमंत्रण दिल्याचे आरोप करत काशिद आणि अस्लम शेख यांचे संबंध असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि काशिद खान यांचे काय संबंध आहेत हे उघड झाले पाहिजे तसेच अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा नेते मोहित भारतीय यांनी केली आहे.

एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार कसा आग्रह करु शकतो?

नवाब मलिक यांना पत्रकार परिषद घेत आज अनेक गौप्यस्फोट केले. यावर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांच्या सर्व आरोपांना प्रतिउत्तर दिले. तसेच काशिद खान आणि अस्लम शेख संबंधांवरही भाष्य केले. यावर बोलताना काशिद खान म्हणाला की, “काशिफ खान अस्लम शेख यांना वारंवार या ड्रग्ज पार्टीसाठी बोलवत होता. ओळख नसलेल्या व्यक्तीने एकदा आमंत्रण दिले असते. मात्र ओळख असल्याशिवाय थोडी वारंवार बोलावले जाते? एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार कसा आग्रह करु शकतो? असे अनेक सवाल करत अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी भारतीय यांनी केली आहे.

मंत्र्यांच्या मुला- मुलींचे ड्रग्ज माफिया, ड्रग्ज पेडलरांसोबत काय संबंध?

“दरम्यान अस्लम शेख आणि काशिफ खान यांचे संबंध असल्य़ाचे आरोप मी नाही मलिकांनी केले आहेत. मी फक्त कोण मंत्री यात आहे असं मी विचारलं होतं मात्र मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मलिक यांनीच नाव घेतलं आहे.” असं कंबोज म्हणाले.काशिद खानने अनेक बड्या नेत्यांच्या मुलांना पार्टीत येण्याचे निमंत्रण दिलं होतं. किती वेळा हे निमंत्रण दिलं? काशिदने या मुलांसोबत कुठे बैठक घेतली? काशिद खान आणि या नेत्यांच्या मुलांचे संबंध काय? याची चौकशी झाली पाहिजे. बरं झालं मलिक यांनी ही माहिती उघड केली. आत्ता सर्वच गोष्टी बाहेर येतील.” असंही भारतीय म्हणाले.नवाब मलिकांनी राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांच्या मुला- मुलींचे ड्रग्ज माफिया, ड्रग्ज पेडलरांसोबत काय संबंध आहेत? याचा खुलासा करावा. कारण त्यांची ही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. ड्रग्ज पेडरल आणि मंत्र्यांच्या मुलांमध्ये काय संभाषण व्हायचे. कसे बोलावले जायचे? यासंदर्भात माहिती मलिकांनीच मीडियासमोर आणली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा खुलासाही देशासमोर करावा” अशी मागणी भारतीय यांनी केली आहे.

मलिक कारवाईच्या भीतीने प्रकरणाला वेगळं वळणं देता

“सुनील पाटीलबद्दल खुलासा केल्यानंतर मलिकांनी त्याच्यासोबत बातचीच झाल्याचे मान्य केले. विजय पगारेचं नाव घेताच विजय पगारे देखील त्यांना भेटल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे सुनील पाटीलद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने हा कट रचला आहे. मात्र या प्रकरणात जसजसे नवे खुलासे होत आहेत त्यावर राष्ट्रवादी आता खोटे आरोप करत आहेत. त्यांच्या मुला-मुलीप्रमाणे मी खोट सांगत नाही. त्यांचा मुलगा २२- २२ प्रॉपर्टी घेऊन ४० वर्षाची कमाई ४७ लाख दाखवतो, त्यामुळे त्यांना आत्ता वेगवेगळ्या कारवाईला उत्तर द्यावे लागेल. यामुळे या ड्रग्ज प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.” असे आरोप भारतीय यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गँगस्टार शरद मोहोळच्या पत्नीने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, प्रवेश मात्र टाळला!

News Desk

मेट्रो कारशेडच्या न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk

कोश्यारीजी इतका अभ्यास बरा नाही; राऊतांचा टोला

Aprna