मुंबई। मुंबई येथे एनसीबीने छापा टाकल्यानंतर चर्चेत आलेल्या समीर वानखेडे यांच्याविषयीचे व्हॉट्स ॲप चॅट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता व्हायरल केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी हे चॅट व्हायरल केले असून हे चॅट के. पी. गोसावी आणि खबऱ्यातील आहेत. लोकांना कसे अडकवायचे याचे संभाषण त्यात आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देतानाच एनसीबीवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. मला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं. त्यानुसार व्हाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे. त्याची माहिती या चॅटमधून दिली जात आहे. केपी गोसावी फोटो पाठवायला सांगतात. त्यानंतर काशिफ खानचा फोटो पाठवला जातो. ज्या प्रमाणे फोटोच्या आधारे लोकांना ओळख करून ताब्यात घेतलं गेलं. त्याच पद्धतीने काशिफ खानला अटक का करण्यात आली नाही? तो क्रुझवर दोन दिवस काय करत होता? असा सवाल मलिक यांनी केला आहे.
समीर दाऊद वानखेडेंची खासगी सेना
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे काय संबंध आहेत अशी विचारणा देखील आता नवाब मलिक यांनी केली. काशीफ खानच्या विरोधात पुरावे देऊनही त्याला अटक का केली जात नाही? असे एक ना अनेक सवाल आता अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. हे चॅट व्हायरल करताना ही समीर दाऊद वानखेडेंची खासगी सेना आहे. त्यांना उत्तर द्यावे लागेल असेही मलिक यांनी लिहिले आहे.कार्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकल्यानंतर अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य संशयितांना अटक केली होती. त्यानंतर या छाप्यावर संशय व्यक्त करत नवाब मलिक यांनी अनेक दावे केले होते.
Here are whatsapp chats between K P Gosavi and an informer which shows how they were planning to trap people who were going to attend the party on the Cordelia Cruise.
This is Sameer Dawood Wankhede's private army therefore he has a lot to answer pic.twitter.com/Et6VNrQefR— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
जाती-धर्मावरुन वाद
नवाब मलिक यांनी वानखेडे यांची जात आणि कथित धर्मांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे, समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच त्यांच्याशी माझ्या मुलीने लग्न केल्याचा दावा समीर वानखेडे यांच्या पहिल्या बायकोच्या वडिलांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.