HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुख दाऊदच्या साथीदारासोबत सह्याद्रीवर काय करत होते, मोहित भारतीय यांचा सवाल

मुंबई। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते मोहित भारतीय यांनी अनिल देशमुख सह्याद्री अतिथीगृहात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या साथीदारासोबत काय करत होते असा सवाल मोहित भारतीय यांनी केला आहे. या दोघांमध्ये कोणती डिलिंग केली का? त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं खुलासा करावा अशी मागणी मोहित भारतीय यांनी केली आहे. तसेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सुनिल पाटील हा मास्टरमाईंड असून तो सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधीत असल्याचा आरोपही मोहित भारतीय यांनी केला आहे.

चिंकू पठाण अनिल देशमुख यांच्यामध्ये भेट

भाजप नेते मोहित भारतीय यांनी आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला. नवाब मलिक यांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात सुनिल पाटील हा मुख्य सुत्रधार आहे. सुनिल पाटील हा राष्ट्रवादीचा सदस्य असून त्याचे नेते आणि मंत्र्यांसोबत चांगले संबंध असल्याचे मोहित भारतीय यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक आणि सुनिल पाटील हे ललित हॉटेलमध्ये भेटत होते. परंतु सुनिल पाटील आणि दाऊदचा साथीदार चिंकू पठाण हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये भेट झाली असल्याचे मोहित भारतीय यांनी सांगितले.मोहित भारतीय यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सह्याद्रीवर भेट झाली असल्याचा फोटो दाखवला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन असताना चिंकू पठाण सह्याद्रीत कशाला गेला होता. चिंकू पठाण हा घातक ड्रग्ज एमडीचा तस्कर आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि चिंकू पठाणच्या भेटीदरम्यान एका मंत्र्यांचे जावईसुद्धा उपस्थित होते. ड्रग्ज पेडलरांकडून किती हप्ता घ्यायचा याबाबतचे डिलिंग झाले का? असा सवाल मोहित भारतीय यांनी केला आहे.

सुनिल पाटील आणि मलिकांच्या संबंधाची चौकशी करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि सुनिल पाटील यांच्यामधील संबंधांची एसआयटी चौकशी केली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणीही मोहित भारतीय यांनी केली आहे. सुनिल पाटील यांच्या नावे हॉटेल ललितमध्ये एक रुम ८ महिन्यांपेक्षा जास्त काळ बुक होती. सुनिल पाटील याला भेटण्यासाठी नवाब मलिक जायचे त्यांच्यात काय चर्चा व्हायची? माजी गृहमंत्री यांचा मुलगा ऋषीकेश देशमुखही सुनिल पाटील यांच्या भेटीसाठी ललित हॉटेलमध्ये का जायचे? असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये, काँग्रेसच्या ६ आमदारांचा प्रवेश लांबणीवर

News Desk

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

News Desk

‘ओबीसींवर सर्वपक्षीय बैठक संपली’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

News Desk