HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेस सज्ज –  नाना पटोले

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वार्डनिहाय चर्चा करून प्रत्येक वार्डात संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात चर्चा झाली असून मतदार पुनर्रचना करताना त्यात अनेक त्रुटी झाल्या आहेत. एससी, एसटी, महिलांना यात योग्य ते प्रतिनिधीत्व दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे.

त्यासंदर्भात जेष्ठ नेते जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल मुख्यमंत्री व निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. मुंबई शहराच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून हे शहर आणखी चांगलं कसं होईल यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येतात म्हणून राज्यात कोरोना वाढतोय का?”

News Desk

ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही !

swarit

सुजय विखे-बाळासाहेब थोरात यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk