HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… राज्यातील ऑरेज आणि ग्रीन झोनमध्ये काय सुरू होणार

मुंबई | राज्यात आजपासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे असे काल (१९ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगांना माफक मुभा देण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने आज (२० एप्रिल) काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आतापर्यंत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती. परंतू अर्थचक्र सुरु करतांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथचे राहण्याची व्यवस्था करतील त्यांना आजपासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरु करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्वीकारायचा नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यांच्या सीमा बंदच

जिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले की एका जिल्ह्यातील माणसे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास अजूनही परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाऊन संपलेला नाही. ३ मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. राज्यात अँटी कोरोना पोलीसही उत्तम सेवा देतांना दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

राज्यात कोणता जिल्हा कोणत्या ‘झोन’मध्ये येतो ? जाणून घ्या

रेड झोन – मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबाद

ऑरेंज झोन – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, गोंदियाग्रीन झोन – धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली

लॉकडाऊनमध्ये कोणाला मिळणार सुट

सुरू राहणाऱ्या सेवा

  • रुग्णालये
  • संशोधन केंद्र
  • प्रयोगशाळा,
  • औषधाची दुकाने
  • वैद्यकीय साहित्या उत्पादन आणि विक्री

आजपासून सुरू होणार

  • शेती : शेतीविषयक कामे, शेती व बागायती कामांसाठी साहित्याची विक्री व उत्पादन, कृषिमाल खरेदी केंद्रे,
  • मत्स्य व्यवसाय, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री, पोल्ट्री फार्म, हॅचरीज, पशुखाद्य निर्मिती प्रकल्प
  • बँकिंग आणि पतपुरवठा
  • बँक शाखा आणि एटीएम, कॅश मॅनेजमेंट एजन्सिज, इन्शुरन्स कंपनी, सहकारी पतसंस्था.
  • मनरेगा : सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मजुरांना ही कामे करता येतील.
  • जीवनावश्यक वस्तूंची विक्री, वाहतूक आणि साठवणूक. दुकाने उघडण्याची किंवा बंद करण्याच्या वेळेचे कोणतेही बंधन नाही.
  • गॅरेज व धाबे
  • ट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरू करण्यास परवानगी
  • इंधन विक्री आणि वाहतूक
  • पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन व गॅसची वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्री
  • पोस्टल, कुरिअर सेवा, दुरध्वनी, इंटरनेट सेवा
  • ब्रॉडकास्टिंग, डीटूएच आणि केबल सेवा
  • ५० टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटीसंबंधित सेवा
  • कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स

हे सर्व बंदच राहील

  • मेट्रो व लोकलसह रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूक
  • रस्ता मार्गाने होणारी खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूक
  • टॅक्सी, रिक्षा व ओला-उबरसारख्या अ‍ॅपआधारित प्रवासी सेवा
  • सर्व शाळा, कॉलेजे, विद्यापीठे, अन्य प्रशिक्षण संस्था व कोचिंग क्लास
  • सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे
  • वैद्यकीय कारणांखेरीज लोकांचे आंतरजिल्हा व आंतरराज्य येणे-जाणे
  • देशांतर्गत सर्व विमान वाहतूक
  • सामाजिक, राजकीय, क्रीडाविषयक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक यासह गर्दी होईल असा अन्य कोणताही कार्यक्रम विशेष परवानगी नाही
  • अन्य व्यावसायिक व औद्योगिक आस्थापने विशेष परवानगी दिलेल्यांखेरीज सर्व निवासी हॉटेल, लॉज, बोर्डिंग हाऊस व वसतिगृहांसह ‘हॉस्पिटॅलिटी’ उद्योग
  • सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सेमिनार स्थळे, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा व जिम, स्वीमिंग पूल, उद्याने, थीम पार्क, बार आणि उपाहारगृहे अंत्ययात्रेला जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता अजित पवारांनी ‘चंपा’ म्हणणं थांबवलं नाही, तर…! चंद्रकांत पाटलांचा टोकाचा इशारा 

News Desk

सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत – देवेंद्र फडणवीस

News Desk

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी या अभिनेत्रींना NCB ने बजावले समन्स

News Desk