HW News Marathi
महाराष्ट्र

सुप्रिया सुळे खड्ड्या बरोबर सेल्फी काढतात तेंव्हा !

पुणे – सध्या सेल्फी काढण्याचे एक पद्धत रुढ झाली आहे. आवडता नेता, अभिनेता, खेळाडूं बरोबर सेल्फी काढतानाची अनेक उदाहरणे आहेत. पण कोणी खड्ड्या बरोबर सेल्फी काढत असेल तर…..हो खड्ड्या बरोबर….राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क खड्ड्या बरोबर सेल्फी काढला आहे. शिवाय हा सेल्फी त्यांनी ट्वीटही केला आहे. तो ट्वीट करताना त्यांनी तो राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना टँग केला आहे. १५ डिसेंबर पर्यंत राज्यात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही अशी नवी तारीख पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी अशा पद्धतीने सेल्फी काढून पाटील यांना त्यांच्या डेडलाईनची आठवण करून दिली आहे. कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत खासदार सुप्रिया सुळेंनी सेल्फी काढले आणि ट्वीटरवर पोस्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत पण…’गृहमंत्र्यांचे त्या चौकशीवर स्पष्टीकरण

News Desk

निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायलाच हवे, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू !

News Desk

नारायण राणे थेट उच्च न्यायालयात जाणार!

News Desk
देश / विदेश

राज्यसभेत उपसभापती पदासाठी मतदानाला सुरुवात

swarit

नवी दिल्ली | राज्यसभा उपसभापती पदासाठी गुरुवारी (आज) मतदानाला सुरुवात झाली आहे. एनडीएचे खासदार हरिवंश आणि यूपीएचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात उपसभापती पदासाठी लढत होणार आहे. नक्की कोणत्या पक्षाचा उपसभापती होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे पी. जे. कुरियन १ जुलै रोजी निवृत्त झाल्याने राज्यसभेतील उपसभापतीपद रिक्त झाले होते. राज्यसभेचे सध्या २४५ खासदार आहेत. उपसभापती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी १२३ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक ७३ खासदार असून काँग्रेसचे ५० खासदार आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी आडिशोचे मुख्यमंत्री तथा बिजदचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्याकडे पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

Related posts

दहशतवादी हल्यात जखमी झालेल्या गर्भवती महिलेची यशस्वी प्रसुती

swarit

राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला

News Desk

87 वर्षाचा पोस्टमन निघाला 1300 बालकांचा बाप

News Desk