HW News Marathi
महाराष्ट्र

‘सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास कधी सुरू होईल?’, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई शहर आणि उपनगर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. मात्र, आता कोरोनाची लाट ओसरली असून आता मुंबईच्या सोबतचा आसपासच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार या भागांतही कोरोना रुग्णसंख्येत आता आटोक्यात आली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामांन्यांसाठी कधी सुरू होणार? हा प्रश्न सर्वांच्या मनात घोंगावत आहे.

सर्वसामान्य जनता, राजकीय नेते, कार्यकर्ते आणि रेल्वे प्रवाशांनी जोरदार मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सांगितले की, मुंबई लोकल गाड्या सुरू करता येतील. परंतु राज्यात लसीकरण वेगवान झाले तरच हे शक्य आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना लेव्हल-३ वर आणले गेले आहे. मुंबई लोकल गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत आणि लोक प्रवास कसा करतात, असा प्रश्न आहे. लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी कार्यकर्ते आणि पत्रकार देखील आता करतांना दिसता आहेत, ‘जर आपल्याला अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणायची असेल तर लसीकरणाला आपण अत्यंत महत्त्व दिले पाहिजे. सरकारी लोक आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांना प्रवासास परवानगी आहे.

या महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील मुंबई लोकल सेवा एप्रिलमध्ये सर्वसामान्यांसाठी दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कोविड -१९ टास्क फोर्सने कोरोनाच्या तिसरा लाटेची भीती व्यक्त केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात म्हटले आहे की, कमीतकमी जुलै अखेरपर्यंत वकिलांना उपनगरी गाड्यांमधून प्रवास करता येणार नाही.

तर याच आठवड्यात काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ठाकरे सरकारकडे एक मागणी केली की, ज्यांना लस दिली गेली आहे. त्यांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याबाबत विचार व्हावा. याबाबत राजेश टोपे यांनी हे देखील सांगितले की, महाराष्ट्र हे देशातील असे एक राज्य आहे, मोठ्या प्रमाणात लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण केले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दुसरा डोस बाकी आहे, तेथे अधिक लक्ष द्यावे लागेल. ज्या जिल्ह्यांमध्ये हे संक्रमण जास्त आहे तेथेही लक्ष देण्यात येत आहे. तसेच लसीकरणात मागे पडलेल्या जिल्ह्यांनाही पुढे जावे लागेल असं देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंदाची बातमी! पुण्यात ५४८ जणांना डिस्चार्ज

swarit

ब्रेकिंग: छगन भुजबळ यांच्या लढ्याला मोठे यश

Sanjay Jog

डॉ. सावंत यांच्या पुस्तकांनी दिला जंगलभ्रमंतीचा सुंदर अनुभव! – उद्धव ठाकरे

Aprna