HW News Marathi
महाराष्ट्र

आपलं घराणं कुठलं? आणि आपण…, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

सातारा। उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या दोघांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. आणि आता देखिल तोच प्रत्यय पहायला मिळाला आहे. दोघेही भोसले एकाच पक्षात जरी असले तरी देखील त्यांच्यात ताणतणावाचं वातावरण नेहमीच पाहायला मिळतं. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतादेखील उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा समोरासमोर आले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना आता चक्क घराण्याचीच आठवण करुन दिली आहे. आपलं घराणं कुठलं, आपण करताय काय?, असा प्रश्नच आता शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना केलाय.साताऱ्यात नगरपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच आता उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या विकासकामांच्या शुभारंभाचा चांगला धडाका लावला आहे. यावर बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंनी चालवलेली दुचाकी आणि पोस्टरबाजीवर चांगलीच टीका केली आहे.

सातारच्या विकासकामांवर खर्च केला असतातर बरं झालं असत

उदयनराजे भोसले यांनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टर बाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकासकामांवर खर्च केला असतातर बरं झालं असत. अशी टीका आता शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने खा.उदयनराजे यांची ही नौटंकी सुरू असल्याचे टोला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावलाय.सातारा सर्किट हाऊसवर झालेल्या उदयनराजे आणि रामराजे यांच्या भेटीवर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, ‘ज्या रामराजेंना दाखवतो आणि बघतो ची भाषा केली त्यांच्याशी चर्चा करायला कशाला जायचं. आपलं घराणं कुठलं? छत्रपती घराणे आहे असा खोचक टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला.

10 वर्षे खासदार असताना आरोग्यमंत्री यांनी भेट दिली नाही का?

खासदार उदयनराजेंनी एकदा आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला असं नसून मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत. मग 10 वर्षे खासदार असताना आरोग्यमंत्री यांनी भेट दिली नाही का? की आरोग्यमंत्री यांचा पत्ता माहीत नव्हता असा खोचक सवालही शिवेंद्रराजे यांनी विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेली 20 वर्षे आपली सेवा केल्यामुळे मी आज आमदार आणि मंत्री झालो! – धनंजय मुंडे

Aprna

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Aprna

अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

News Desk