मुंबई | आज (४ नोव्हेंबर) रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अटक केली. त्यावरुन राज्य सरकार आणि भाजपमध्ये चांगलीच वादावादी झाली. यावर आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही ट्विट केले आहे.
‘सकाळी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात बोलणारे भाजप नेते भाजपशासित राज्यांमध्ये अनेक डझन पत्रकारांना अटक झाली तेव्हा कुठे होते’, असा प्रश्न प्रशांत भूषण यांनी भाजपला विचारला आहे.
The way in which the Union ministers have come out against ArnabGoswami's arrest by Mumbai police is touching, especially their calling it an emergency. They said nothing when BJP govts arrested dozens of journalists. Also when their NIA/CBI/ED/Police harasses & arrests activists
— Prashant Bhushan (@pbhushan1) November 4, 2020
दरम्यान, या आधी देखील प्रशांत भूषण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसऱ्याच्या भाषणावरुन कौतुक केले होते. त्यात त्यांनी असे लिहिले होते की की शिवसेनेचा किंवा उद्धव ठाकरे यांचा फॅन नव्हतो पण जसे उद्धव ठाकरेंनी स्वत:ला घडवले ते ह्रदयाला भिडले असे त्यांनी या आधीही म्हटले होते.
तर दुसरीकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. आणीबाणीची स्थिती सरकारने उपस्थित केली असेही म्हटले जात आहे. तर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि कन्या आज्ञा नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अर्णब गोस्वामी यांनी मानसिक त्रास तसेच धमक्या दिल्या होत्या. यावेळी अक्षता नाईक यांनी म्हटले की, माझ्या नवऱ्याच्या आणि सासूच्या देहावर जे रिपब्लिक चॅनल सुरु आहे ते बंद झाले पाहिजे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.